संगीत हे आपल्या भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग कुठल्याही प्रकारच्या संगीताची जादू काही निराळीच संगीत ऐकणे शिकणे आणि संगीताचा वारसा जपत संगीताची आवड जोपासणारे एकत्र येऊन जेव्हा काहीतरी या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवन्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती संगीत रसिकांसाठी पर्वणीच ठरते असाच एक वेगळा प्रयत्न केलाय धृपदगंगा फौंडेशन तर्फे .
संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले , करियरसाठी हे क्षेत्र निवडून सरस्वतीची सेवा करणारे काहीजण त्यांच्या ह्या प्रवासात वेगवेगळ्या क्षेत्रांतील संगीत प्रेमी एकत्र आले आणि धृपदगंगा ची स्थापणा झाली . वास्तविक पाहता धृपद हा गाण्याचा एक प्रकार ह्या प्रकारात गायन करणाऱ्यांनी सुरू केलेले धृपदगंगा फाउंडेशन ह्या मार्फत संगीत प्रेमींना वेगवेगवळ्या गायन प्रकार वाद्य ह्यांची श्रवणीय मेजवानी तर मिळतेच पण नवोदित विद्यार्थ्यांना स्टेज निळावा हा त्यामागचा उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये संगीताचा आणि विविध कलांचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी प्रयत्न करन्यात येणार आहेत .निराधार , गरीब पण कलेची आवड असनाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत संगीत शिक्षण देणे भारतीय संस्कृतीतील कलेचे संवर्धन करणे अशी अनेक उद्दिष्टे समोर ठेऊन ह्या फौंडेशन ची स्थापना झाली.
मनावरचा ताण हलका करण्यासाठी संगीतासारखा दुसरा पर्याय नाही हे तर आपण जाणतोच व्यसनमुक्ती बालसंगोपन आरोग्य शिबीर ह्या सर्वांसाठी संगीतातून जण जागृती करण्याचे काम फौंडेशन द्वारे केले जाणार आहे